Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
उपचारपद्धतीचा संशोधनात्मक पाया

डॉ. विराज केळकर वैद्यकीय सेवेचा वारसा असलेले. त्यांच्या घरात आधीच्या दोन पिढ्या वैद्यकीय सेवेत होत्या. त्यांचे आजोबा आणि नंतर वडिल यांनीही वैद्यकीय सेवा केली. कुटुंबातच डॉक्टरकीचा वारसा असलेल्या डॉ. विराज यांना या व्यवसायाचे बाळकडूच मिळाले होते. लहानपणापासूनच घरी च्यवनप्राशसारखे पदार्थ बनविले जायचे. विविध प्रकारची गुगुळे, काढे आणि चूर्ण यासाठी विशिष्ट पदार्थांचे प्रमाणात मिश्रण करून त्यांची बारीक पूड बनवली जायची. त्यामुळे खरे पाहिले, तर आयुर्वेदाची थिअरी आणि प्रॅक्टिस याचे प्रशिक्षण डॉ. विराज यांना बालपणापासून घरच्या घरीच मिळाले. त्यामुळे करिअर निवडीबाबत त्यांना फार विचार करावा लागलाच नाही. त्यांनी हडपसरच्या सुमतीभाई शाह आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. वैद्यकीय क्षेत्रात अद्ययावत व्हावे यासाठी त्यानंतर आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (सीसीआरएएस) या मुंबईतील वरळी येथे असलेल्या संस्थेशी ते संलग्न झाले. इथूनच त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाच्या करिअरला थोडेसे वेगळे वळण लागले.

वरळीतल्या या आयुर्वेद कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम केले. त्यामुळे घरात दोन पिढ्यांपासून असलेला वैद्यकीय व्यवसायाचा वारसा एका अर्थाने त्यांच्यापासून दूर गेला. परंतु तो काही काळासाठीच. दुसर्या बाजुला आयुर्वेदातल्या अत्यंत महत्त्वाच्या संशोधनाशी नियतीने त्यांची गाठ बांधून ठेवली होती. संशोधनाचा हा काळ आयुर्वेदाबद्दलचे ग्रंथांमध्ये वाचलेले ज्ञान, त्याची असलेली समज आणि त्याचे उपयोजित संशोधन यातील पडदे दूर करण्यासाठी फारच उपयुक्त ठरला. या काळात शरीरातील विविध अवयवांशी निगडित कॅन्सर, त्यांची लक्षणे, त्यांच्या वाढीचे पॅटर्न, त्यांचे निदान, त्यांच्यावरील उपचार आणि त्यातील आयुर्वेदाचे महत्त्व या सगळ्या गोष्टींवर अत्यंत बारकाईने अभ्यास करण्याची संधी डॉ. विराज यांना मिळाली.
या इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण दाखल केले जायचे. प्रत्येकाच्या कॅन्सरची स्टेज वेगळी, लक्षणे वेगळी. यामुळे एकाच प्रकारच्या कॅन्सरचा वेगवेगळ्या वयाच्या, प्रकृतीच्या रुग्णांवर कसा परिणाम होतो, हे डॉ. विराज यांना समजून घेता आले. तसेच एकाच वयाच्या, प्रकृतीच्या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा परिणाम कसा होतो, हेदेखील जाणून घेता आले. मुख्य म्हणजे या सगळ्याच्या शास्त्रीय पद्धतीने घेतलेल्या नोंदी आणि त्यावर आधारीत निष्कर्ष याच्या अभ्यासातून डॉ. विराज यांच्यात संशोधकाची दृष्टी निर्माण झाली. यामुळे आयुर्वेदातील पदवी हाती आल्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये जाण्याआधीच त्यांच्यात चिकित्सक वृत्ती विकसित झाली. प्रॅक्टिसमध्ये त्यांना आता उपयोग होत आहे.
पण एवढ्यावरच प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये येणे डॉ. विराज यांच्या नशिबी लिहिलेले नव्हते. त्यांच्यापुढे नियतीने आणखी काही लिहून ठेवले होते. त्यानुसार ते नवी मुंबईतल्या खारघरमध्ये असलेल्या वायएमटी आयुर्वेद महाविद्यालयात अधिव्याख्याता या पदावर रुजू झाले. अधिव्याख्याता पदावर काम करत असतानाच आयुर्वेदाची प्रत्यक्ष प्रॅक्टिस करण्याच्या त्यांच्या मनातल्या ऊर्मीला थोडासा वाव मिळाला आणि त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. ही प्रॅक्टिस सुरू केल्यानंतरही आयुर्वेदाच्या क्षेत्रातले अत्याधुनिक जे जे काही मिळेल ते समजून घेण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कॅन्सरसारख्या रोगावरच्या संशोधनामुळे त्यांच्या मनात आयुर्वेदाबद्दलचा विश्वास ठाम बसला होता. दुसरीकडे अधिव्याख्याता म्हणून काम करत असताना ग्रंथांमध्ये विविध आयुर्वेदाचार्यांनी दिलेले ज्ञान एखाद्या दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत होते. असे असले तरीही कॅन्सरसारख्या रोगाशी संबंधित आयुर्वेदिक उपचारांवर केलेल्या संशोधनातून आयुर्वेदासाठी तशा अर्थाने प्रतिकूल असलेल्या जीवनशैलीत अत्याधुनिक, सध्याच्या जीवनशैलीशी सांगड घालू शकेल असे, रुग्णांना तातडीने रिझल्ट देऊ शकेल असे काही मिळतेय का याचा शोध डॉ. विराज यांची नजर कायम घेत होती.
अॅलोपॅथीचा बोलबाला सर्वत्र असण्याच्या आजच्या काळात आयुर्वेदाकडून फास्ट आणि पिन पॉईंटेड रिझल्टची लोकांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने काही नवे करू शकलो तर ते करण्याचा डॉ. विराज यांचा मानस होता. अशातच एके दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट आली. त्या पोस्टमध्ये डॉ. हरिश पाटणकर आणि त्यांच्या केशायुर्वेद या संकल्पनेविषयीची माहिती होती. त्यानुसार त्यांच्याकडे कोर्स केला. त्यावेळी त्यांच्याशी ओळख झाली आणि वैद्य पाटणकरांचा आयुर्वेदाबद्दलचा अत्यंत गाढा अभ्यास, प्रत्यक्ष प्रॅक्टिसमधील अनुभव आणि संशोधनातून आलेले ठामपण हे मनात ठसले. आयुर्वेदात ज्यांना गुरूचा दर्जा देता येऊ शकेल, अशांमध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे, असे पाटणकर सर आहेत, हे तेव्हाच डॉ. विराज यांच्या मनात अधोरेखित झाले.
पाटणकर सरांची केशायुर्वेद ही संकल्पना फारच अनोखी आहे. डॉ. विराज यांनी स्वतः काही वर्षे आयुर्वेदिक संशोधनाच्या क्षेत्रात काम केल्यामुळे संशोधनाची, क्लिनीकल रिसर्चची शास्त्रशुद्ध पद्धत, निष्कर्ष अशा अनेक बारीकसारीक गोष्टींची त्यांना चांगली माहिती होती. त्या पातळीवर पडताळून पाहिल्यावर केशायुर्वेद ही निश्चितच अत्यंत शास्त्रशुद्ध आणि संशोधनाच्या मजबूत पायावर आधारीत नवी उपशाखा असल्याचे त्यांना जाणवले. पाटणकर सरांनी या विषयासंदर्भात केलेल्या मांडणीवर त्यामुळे डॉ. विराज यांचा अगदी पटकन विश्वास बसला आणि मी लगेच केशायुर्वेद परिवाराशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर पाटणकर सर आणि केशायुर्वेद याच्याशी नाळच जोडली गेली. कोणत्याही समस्येबाबत सांगितल्यावर पाटणकर सर त्यावर इतके मुलभूत विश्लेषण करतात की ऐकणार्याच्या डोक्यात ती संकल्पना अगदी फिट बसून जाते. त्यामुळे त्यांच्या सहवासात अधिकाधिक राहण्याची इच्छाच मनात उत्पन्न होत गेली. केशायुर्वेद फ्रँचायजी हे शंभराहून अधिक वैद्यांच्या क्लिनीकचे जाळे आहे. या जाळ्यातील प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांशी जोडली गेलेली आहे. विशेष म्हणजे हे जाळे ज्याला आपण ‘ऑरगॅनिक’ म्हणतो तसे एकजिनसी जाळे आहे. या सर्वांशी सोशल मीडिया, फोन, चॅटींग यांच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे. अनेक फ्रँचायजीधारक आपापसांत चर्चा करूनही काही वेळेस समस्या सोडवतात. त्यामुळे चिकित्सक वृत्तीत भर पाडणारी, सतत नव्याचा शोध घेण्याची ऊर्मी कायम जागृत ठेवणारी केशायुर्वेद ही एक अत्यंत उत्तम संकल्पना आहे, असे मत डॉ. विराज व्यक्त करतात. लोकांच्या केसांच्या समस्यांचे कमी वेळेत शास्त्रीय निदान करणारी आणि त्याच्या आधारावर त्यांना तातडीने उत्तम रिझल्ट देणारी ही संकल्पना असल्याचे ते सांगतात.

 

Organization Details

नाव : डॉ. विराज केशव केळकर
शिक्षण : एमडी (आयुर्वेद)
क्लिनिकचे नाव : ग्रीन लीफ आयुर्वेद
पत्ता : एलबीएस रोड, दामोदर पार्क, घाटकोपर (पश्चिम), मुंबई.
मोबाईल : 9860672704
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 2015 पासून
केशायुर्वेदशी संलग्नित : 2017 पासून

Our Specialities

  • One stop solution for all your hair and skin problem.
  • Accurate diagnosis and perfect treatment.
  • Complete Scalp Analysis, Photography, Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient) and HP (Hair Prakruti) analysis.
  • Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s, Cosmetologist’s, Trichologist’s.
  • Wide range of hair and skin care herbal products.